बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी यादव पिता-पुत्रांना दिलासा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव आणि त्यांचे सुपुत्र अखिलेश यादव यांच्यासाठी दिलासादायक वृत्त आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) अखिलेश आणि मुलायम सिंह यादवांना क्लीन चिट दिली आहे. सीसीबीआयने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. यामध्ये प्राथमिक तपासात आरोपांची पुष्टी झाली नसल्याने ७ ऑगस्ट २०१३ साली याप्रकरणाचा तपास बंद करण्यात आला आहे.

राजकीय कार्यकर्ते विश्वनाथ चतुर्वेदी यांनी २००५ साली याप्रकरणी याचिका दाखल केली होती. यामध्ये मुलायम सिंह यादव, त्यांची पत्नी डिंपल यादव आणि त्यांचा मुलगा प्रतीक यादव यांच्याविरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून उत्पनापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याचा आरोप लावला आहे. याप्रकरणी २००७ साली सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला आरोपांमध्ये तथ्य आहे कि नाही हे तपासण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, सीबीआयने आज  अखिलेश आणि मुलायम सिंह यादवांना क्लीन चिट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.