मोदीजी तुम्हीच पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हा : मुलायम सिंग यादव  

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते मुलायम सिंग यादव यांच्या आजच्या लोकसभेतील वक्तव्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या. विरोधकांच्या बैठकीतील सोनिया गांधी यांच्या बाजूच्या आसनावर बसलेल्या मुलायम सिंह यादव यांनी आज लोकसभेमध्ये बोलताना चक्क “मी प्रार्थना करतो की विद्यमान पंतप्रधान पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान व्हावे.” असे विधान केल्याने विरोधकांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाले तर सत्ताधाऱ्यांकडून मात्र मुलायमसिंह यांच्या या वक्तव्याचे ‘जय श्रीराम”च्या गजरात स्वागत करण्यात आले.

मुलायम सिंह यादव यांनी एवढ्यावरच न थांबता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर स्तुतीसुमने वाहत, “मोदींनी सर्वांना एकत्र घेऊन काम केले आहे.” असे वक्तव्य देखील केले.

कौटुंबिक कलहामुळे मुलायम सिंह यादव यांच्यापासून दुरावलेले त्यांचे पुत्र अखिलेश यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा विडा उचलत उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाबरोबर हात मिळवणी केली आहे. अशातच आता मुलायम सिंह यादव यांच्या पंतप्रधानांवरील स्तुतिसुमनांमुळे उत्तर प्रदेशात आणखीन कोणती राजकीय समीकरणे दिसू शकतात? या प्रश्नास वाव मिळाला आहे.

दरम्यान मुलायम यांच्या स्तुतीमुळे सुखावलेल्या पंतप्रधान मोदींनी लोकसभेमध्ये बोलताना त्यांचे आभार देखील मानले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
14 :joy:
7 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)