मुकेश अंबानींचा महाराष्ट्राला मदतीचा हात; १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा देणार मोफत

मुंबई – राज्यात करोना बाधित वाढल्यामुळे ऑक्‍सीजनचा तुटवडा भासत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत आहेत. 30 एप्रिलपर्यंत ही रुग्ण संख्या 11.9 लाखापर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे. सध्या 5.64 लाख सक्रिय बाधित आहेत. त्यामुळे ऑक्‍सिजनचा तुटवडा चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कडक निर्बंध लावले असून केंद्राकडेही मदत मागितली आहे. अशातच उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मदतीचा हात दिला आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे.  गुजरातमधील जामनगर येथून महाराष्ट्राला हा ऑक्सिजन पुरवठा केला जाणार असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले कि, रिलायन्सच्या जामनगर प्लँट मधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार. विभागीय आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेलमी अशी माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा करताना बेड्स, व्हेंटिलेटर्ससह ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केल. हवाई मार्गाने ऑक्सिजन अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.