फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल तर गौतम अदानी दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : मधील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्सने २०२१ नुकतीच जाहीर केली आहे. या यादीनुसार १० सर्वात श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी पहिल्या स्थानी पोहचले आहे. तर गौतम अदानी दुसऱ्या स्थानी आहेत. यात यादी मुकेश अंबानींची संपत्ती ८४.५ अब्ज डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली आहे. तर या पाठोपाठ अदानी यांची संपत्ती ५०.५ अब्ज डॉलर्स इतकी मोजण्यात आली आहे.

अरबपत्तींची संपत्तीत वाढ होत असल्याने शेअर बाजारातही तेजीचे वातावरण आहे. देशात कोरोना संसर्ग वाढत असला तरी याचा फायदा उद्योगपतींना होताना दिसतोय. गेल्या वर्षी बेंचमार्क सेंसेक्स ७५ टक्के वाढला आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार, अरबपतींची संख्या गेल्या वर्षी १०२ वरून आत्ता १४० वर पोहचली आहे. तर त्यांची सामूहिक संपत्ती दुप्पट होत ५९६ अरब डॉलर्स झाली आहे. यात कोरोना महामारीच्या काळातही भारतातील तीन सर्वात श्रीमंतांनी एकूण १०० अब्ज माया जमा केली आहे. अंबानींनी जिओ टेलिकॉम कंपनीत ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. २०२१ पर्यंत या कंपनीने कर्जाचे उद्दिष्ट शून्यावर आण्याचे ठरवले आणि ते पूर्णही केले. आशियाच्या सर्वात श्रीमंतांमधील एक असलेल्या रिलायन्स समूहाने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील नवनवीन बदल, योजना आणत मागील वर्षात मोठी गुंतवणूक केली.

अंबानींनी जिओ टेलिकॉम युनिटमधील एक तृतीयांश फेसबुक, गुगल आणि इतर ग्लोबल मार्की गुंतवणूकदारांना विकला. तसेच रिलायन्स रिटेलचा 10 टक्के भाग केकेआर आणि जनरल अटलांटिकसारख्या खासगी इक्विटी कंपन्यांकडे वळविला. फोर्ब्सने जाहीर केले की, रिलायन्स इंडस्ट्रीजने ७.३ अब्ज डॉलर्सचे शेअर्स जारी केले आहेत.

भारतातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गौतम अदानी ठरले आहेत. अदानींच्या संपत्तीत ४२ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. सध्या अदानी समूहाच्या अदानी ग्रीन आणि अदानी एंटरप्राइजेसचे शेअर्सने सध्या आभाळ गाठले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर टाइकूनने व्यवसायात वैविध्यपूर्ण बदल केले आणि भारताच्या विमानतळ व्यवस्थापन आणि ऑपरेशन व्यवसायात विस्तार केला. अदानी समूहाने यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये देशातील दुसऱ्या सर्वाधिक व्यस्त मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामधील ७४ टक्के हिस्सा विकत घेतला. तर अदानीने अदानी ग्रीन एनर्जी कंपनीतील २० टक्के हिस्सा फ्रेंच एनर्जी कंपनीला २.५ अब्ज डॉलर्सला विकला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.