बफेंपेक्षा अंबानी झाले श्रीमंत!

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात जागतिक पातळीवर शेअरबाजार निर्देशांक बरेच अस्थिर होते. मात्र, या परिस्थितीतही काही कंपन्यांनी जोरदार आगेकूच केली आहे. त्यामध्ये मुकेश अंबानी संचलित रिलायन्स इंडस्ट्रीजचा समावेश आहे. परिणामी जागतिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी आता आठव्या क्रमांकावर आले आहेत.

आतापर्यंत या यादीत बोलबाला असलेले अमेरिकेचे अब्जाधीश वॉरेन बफे आता नवव्या क्रमांकावर आले आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडील संपत्ती सध्या 68.3 अब्ज डॉलर आहे. तर बफे यांच्याकडील संपत्ती 67.9 अब्ज डॉलर इतकी आहे.

या वर्षात अनेकांच्या संपत्तीचा घसारा होत असतानाच अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 9.64 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर ज्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे, त्यामध्ये ऍमेझॉन कंपनीचे जेफ बेझॉस आणि इलेक्‍ट्रिक कार निर्माते इलॉन मस्क यांचा समावेश आहे. यावर्षी बफे यांच्या संपत्तीमध्ये 21.4 अब्ज डॉलरची घट झाली.

मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजमधील जिओ प्लॅटफॉर्ममधील जवळजवळ पंचवीस टक्के भागभांडवल मुकेश अंबानी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना उपलब्ध केले. त्यामुळे मुकेश अंबानी त्यांच्या संपत्तीत वेगाने वाढ झाली असल्याचे दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.