मुकेश अंबानी, गौतम अदानी, शिव नाडर… जाणून घ्या भारतातील टॉप १० श्रीमंतांची यादी व त्यांची संपत्ती

मुंबई – फोर्ब्ज मासिकाच्या रिअल टाईम वेल्थ ट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स
इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या वर्षभरात
त्यांच्या एकूण संपत्तीत 60 अब्ज डॉलरची भर पडली. म्हणजेच त्यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी
दर मिनिटाला सुमारे 90 लाख ते एक कोटी रुपयांची भर पडत होती.

संपत्तीत वर्षाला 60 अब्ज डॉलरने वाढ होणे म्हणजे काय असते? 

रुपयाच्या भाषेत बोलायचे तर वर्षात संपत्ती 45,19,17,30,00,000 रुपयांनी म्हणजेच 4.52 लाख कोटी रुपयांनी वाढलेली असते. दिवसाला संपत्ती 12,38,12,95,890 रुपयांनी वाढते म्हणजेच रोज संपत्तीत 1,238 कोटी रुपयांची भर पडत असते.

प्रत्येक तासाला संपत्तीत 51,58,87,329 रुपयांनी वाढ होत असते म्हणजेच तासाला संपत्तीत
51.6 कोटी रुपयांची भर पडत असते.

मुकेश अंबानी हे जगातील दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. जवळपास वॉरेन बफे
यांच्याएवढीच संपत्ती अंबानी यांच्याकडे आहे. चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती झोंग शान्शान
यांच्यापेक्षा त्यांची संपत्ती सुमारे 40 अब्ज डॉलरने जास्त आहे.

श्रीमंत भारतीयांची यादी

भारतातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींची संपत्ती एकत्रित (337 अब्ज डॉलर) केली तर ती
पाकिस्तानच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी – 305 अब्ज डॉलर) पेक्षा जास्त भरते.

1) मुकेश अंबानी – 102.2 अब्ज डॉलर

2) गौतम अदानी आणि कटुंबिय – 75.3 अब्ज डॉलर (वर्षभरापूर्वी अदानी यांच्याकडे यातील केवळ 11 टक्के संपत्ती होती.)

3) शिव नाडर – 30 अब्ज डॉलऱ

4) राधाकृष्ण दमानी – 25.6 अब्ज डॉलर

5) सावित्री जिंदल आणि कुटुंबिय – 19.2 अब्ज डॉलर

6) लक्ष्मी मित्तल – 18.8 अब्ज डॉलर

7) सायरस पूनावाल – 18.2 अब्ज डॉलर

8) कुमार बिर्ला – 16.7 अब्ज डॉलर

9) उदय कोटक – 16.2 अब्ज डॉलर

10) सुनील मित्तल आणि कटुंबिय – 14.7 अब्ज डॉलर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.