रिलायन्स इंडस्ट्रिज जगातील पहिल्या 50 कंपन्यांत सामील
मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर सध्या 2060 रुपये प्रति शेअर या विक्रमी पातळीवर आहे. या कंपनीचे बाजार मूल्य 13 लाख कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे ही कंपनी जगातील पहिल्या 48 व्या क्रमांकावर गेली आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मालमत्ता 75.30 अब्ज डॉलर झाली आहे. आता ते जगात पाचव्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
चौथ्या क्रमांकावरील मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती 89 अब्ज डॉलर आहे. पहिल्या क्रमांकावरील जेफ बेझोस यांची संपत्ती 185 अब्ज डॉलर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरील बिल गेट्स यांची संपत्ती 113 अब्ज डॉलर आहे. सध्याची परिस्थिती पाहता काही महिन्यात अंबानी जगातील सर्वांत श्रीमंत दुसऱ्या क्रमांकाचे व्यक्ती होऊ शकतात असे बोलले जात आहे.
कारण रिलायन्सचा मोबाइल क्षेत्रातील महसूल वेगाने वाढणार आहे. त्याचबरोबर रिलायन्सने रिटेल क्षेत्रात जोरदार आगेकूच करण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे रिलायन्सच्या शेअरच्या भावात आगामी काळात वेगाने वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.