पिरंगुट- मुकाईवाडी (ता. मुळशी) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, माजी सभापती व तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, गटविकास अधिकारी संदीप जठार व सरपंच चांगदेव पवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रेश्मा पवळे, तेजस्विनी उभे, आश्विनी निकटे, छाया पवळे, रामदास गोळे, जनाबाई गोळे, सदस्य राहुल पवळे, महेश वाघ, लक्ष्मण निकटे, अंकुश खडके, श्रीकांत केदारी, सदस्या सुरेखा पवळे, सुवर्णा नवाळे, सारिका गोळे, सारिका केदारी, ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजणे, मुकाईवाडीच्या पोलीस पाटील स्वाती गोळे, भानुदास गोळे, मोहन आवळे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. पिरंगुट ग्रामपंचायतीच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगातून 11 लाख 24 हजार 318 रुपये खर्च करून दीड लाख लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे.
उपसरपंच विकास पवळे म्हणाले की, या पाण्याच्या टाकीमुळे मुकाईवाडी व मतेवाडी या संपूर्ण परिसरातील अनेक वर्षांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. मुळशी प्रादेशिक पाणी योजनेतून पिरंगुट गावठाण ते मुकाईवाडी नवीन पाणी टाकी अशा पाइपलाइनचे काम नव्याने पूर्ण केले. यामुळे
मुकाईवाडी आणि मतेवाडी येथील नागरिकांना मुळशीचे पाणीही मिळणार आहे.