रायपुर – देशातील अनेक राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. काही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होतांना दिसत आहे तर काही राज्यात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाकडून नियम जारी करण्यात आले आहे.
Chhattisgarh | In a viral video, Surajpur District Collector Ranbir Sharma was seen slapping a person and slamming his phone on the ground, for allegedly violating #COVID19 lockdown guidelines pic.twitter.com/z4l0zkdy7C
— ANI (@ANI) May 22, 2021
तरी सुद्धा अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. यातच छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यात सध्या लॉकडाउन लागू आहे. एका तरुणाने लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी सदर युवकाला जोरदार कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचे नाव अमन मित्तल (23) असे आहे. त्याच्या विरोधात लॉकडाउनचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, सुरजपूरचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा शनिवारी दुपारी जिल्ह्यातील स्थितीची पाहणी करण्यासाठी फिरत होते.
याच दरम्यान त्यांनी रस्त्यावरुन जात असलेल्या एका मास्क लावलेल्या युवकाला थांबवले. यानंतर तो तरूण जिल्हाधिकाऱ्यांना एक कागद आणि मोबाईल फोनवर काही दाखविण्याचा प्रयत्न करत होता.याच वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा फोन घेतला आणि तो जमिनीवर फेकला.
सोशल मीडिया के माध्यम से सूरजपुर कलेक्टर रणबीर शर्मा द्वारा एक नवयुवक से दुर्व्यवहार का मामला मेरे संज्ञान में आया है।
यह बेहद दुखद और निंदनीय है। छत्तीसगढ़ में इस तरह का कोई कृत्य कतई बर्दाश्त नहीं किया जाएगा।
कलेक्टर रणबीर शर्मा को तत्काल प्रभाव से हटाने के निर्देश दिए हैं।
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 23, 2021
यावर सोशलवर नेटकऱ्यानी निषेध दर्शवला असून जिल्हाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागताच जिल्हाधिकारी शर्मा यांनी माफी मागितली. या गैरवर्तणुकीबद्दल त्यांना तातडीने पदावरून हटवल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जाहीर केलं आहे. यासंदर्भात आयएएस अधिकारी रणबीर शर्मा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून माफी देखील मागितली आहे. देशातील आयएएस वर्तुळातूनही रणबीर शर्मा यांच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये ३१ मे पर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.