सातारा-कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या व साताऱ्यातील रुग्णांना संजीवनी देणाऱ्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याची मुजोरी समोर आली आहे. जिल्हा पोलीस दलातील एका जवानाला काही दिवसांआधी त्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्याच रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याने त्या कर्मचाऱ्याला “”ए फुकट्या, चल निघ” अशा आशयाची भाषा वापरल्याची ऑडिओ रेकॉर्ड समोर आली आहे.
गेली दहा महिने रस्त्यावर चोवीस तास खडा पहारा देणाऱ्या पोलिसांच्याबाबतील अशी वागणूक असेल तर सामान्य लोकांना कशी असेल याबाबत विचार न केलेलाच बरा. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी अशा मुजोर रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.