महाराष्ट्राच्या संजीवनी कुतवळ, सोनल पाटील आणि रिया भोसले यांची आगेकूच

एमएसएलटीए योनेक्‍स सनराईज नॅशनल सिरिज टेनिस स्पर्धा

पाचगणी  – मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा, ख़ुशी शर्मा, रिया भोसले, रुमा गायकैवारी, आर्या पाटील या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलींच्या गटात पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या संजीवनी कुतवळ हिने कर्नाटकाच्या सुरभि श्रीनिवासचा 6-2, 2-6, 6-2 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. खुशी शर्मा हिने कर्नाटकाच्या विद्युल मणिकांतीचे आव्हान 6-1, 5-7, 6-4 असे मोडीत काढले. सोनल पाटीलने वेदा मधुसूदनचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या जिया परेराने तेलंगणाच्या वैष्णवी वकीतीला 6-4, 6-1 असे नमविले.

सविस्तर निकाल :

पहिली फेरी(मुख्य ड्रॉ) :

16वर्षाखालील मुली : संजीवनी कुतवळ(महाराष्ट्र)वि.वि.सुरभी श्रीनिवास(कर्नाटक)6-2, 2-6, 6-2; सोनल पाटील(महाराष्ट्र)वि.वि.वेदा मधुसूदन(महाराष्ट्र)6-3, 6-2;

अमिशी शुक्‍ला(मध्यप्रदेश)वि.वि.माहिका गुप्ता 7-5, 6-2; जिया परेरा(महाराष्ट्र)वि.वि.वैष्णवी वकीती(तेलंगणा) 6-4, 6-1; ख़ुशी शर्मा(महाराष्ट्र)वि.वि.विद्युल मणिकांती(कर्नाटक) 6-1, 5-7, 6-4;

रिया भोसले(महाराष्ट्र)वि.वि.जननी रमेश(तामिळनाडू)6-0, 6-1; रुमा गायकैवारी(महाराष्ट्र)वि.वि.साज तंडेल(महाराष्ट्र)6-1, 6-1;

दीपशिका श्रीराम(कर्नाटक)वि.वि.पुनर्वा शहा 6-1, 6-1; पूर्वा वेमुरी(तेलंगणा)वि.वि.माही पांचाळ(गुजरात)6-2, 6-1; अनुपमा बगाडे(कर्नाटक)वि.वि.इलिना झा(दिल्ली) 6-0, 6-1;

सुहिता मारूरी(कर्नाटक)वि.वि.कनिष्का मल्लेला(कर्नाटक)6-0, 6-1; आर्या पाटील(महाराष्ट्र)वि.वि.कुमकुम नीला(तेलंगणा) 6-0, 6-4; लक्ष्मी अरुणकुमार वि.वि.सिया देशमुख(महाराष्ट्र) 6-4, 6-4.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.