भाटघर (वार्ताहर) – भाटघर परिसरात पसुरे फिडरमार्फत वीज पुरवली जाते. या फिडरची व्याप्ती 175 किलोमीटर एवढी आहे. या परिसरात महावितरररणची संपूर्ण यंत्रणा उघड्यावर आहे. या भागात पाऊस व वादळाचे प्रमाण जास्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात नुकसान होते. त्यासाठी पावसाळ्याआधीच महावितरणने मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे.
पावसाळ्यात सार्वजनिक विद्युत वितरण व्यवस्थेमध्ये दुर्घटना घडू नये म्हणून महावितरणने कामे सुरू केली आहेत. यासाठी ढिल्या तारा ओढणे, स्विचची दुरुस्ती करणे, डीपी बॉक्समधील कटआऊट बदलणे ही कामे सुरू करण्यात आली आहेत.