पुणे – दीपोत्सवात वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी सज्ज राहण्यासोबतच वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. यासोबतच नवीन वीजजोडणीच्या कामांना वेग देऊन प्रलंबित असणाऱ्या घरगुती, वाणिज्यि व औद्योगिक वर्गवारीतील वीजजोडण्या दिवाळीपूर्वी कार्यान्वित कराव्यात, असे आदेश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत.
नागरिकांनी सार्वजनिक वीजयंत्रणा आणि घरगुती विद्युत उपकरणांपासून सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
महावितरण हेल्पलाइन नंबर
1800-1023-435
1800-2333-435
1912