-->

महेंद्रसिंह धोनी करणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षीने नवीन क्षेत्रात काम करण्याची योजना आखली आहे. महेंद्रसिंह धोनी एका वेब सीरीजसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार असल्याचे समजते.

साक्षी आणि एमएसडीने धोनी एंटरटेन्मेंट हे बॅनर 2019 मध्ये “द रोर ऑफ द लायन’सह लॉन्च केले होते. आता या बॅनरअंतर्गत एक अशी वेब सिरीजची निर्मिती करण्यात येणार आहे, जी एका नवोदित लेखकाने लिहिलेल्या अप्रकाशित पुस्तकाचे रूपांतर आहे. एका मुलाखतीत साक्षीने सांगितले की, मी क्रिएटिव्ह विचार मांडण्याच्या प्रक्रियेकडे अधिक लक्ष दिले आहे.

पडद्यावरील जीवनाची संकल्पना पाहून मला मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. जेव्हा आम्ही “द रोर ऑफ द लायन’ची निर्मिती करत होतो, तेव्हा आम्हाला वाटत होते की, मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करण्याची हीच योग्य वेळ आहे. विशेष म्हणजे, धोनीला कपंनीचा “अल्फा’ आणि साक्षीला कंपनीचा “अल्फा-1′ असे संबोधले जाते. साक्षी म्हणाली, माहीचे सैन्याप्रती असलेले प्रेम जगजाहीर आहे. यामुळे आम्ही पदनामाला अशी एक वेगळा टच देत रॅक देण्याचा विचार केला आहे. ज्यामुळे सशस्त्र सैन्याबद्दल आपल्या सर्वांमध्ये आणखी आदर निर्माण होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.