MS Dhoni : ‘मला पुढील पाच वर्षे खेळण्याची परवानगी मिळालीय, पण…’, माहीचं IPL निवृत्तीबद्दल मोठं वक्तव्य, पाहा VIDEO
एमएस धोनी नेमकं काय म्हणाला?
चेन्नईतील एका कार्यक्रमात धोनीला आयपीएल २०२६ मध्ये खेळण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितले, “मला पुढील पाच वर्षे क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली आहे, पण डॉक्टरांनी फक्त माझ्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी परवानगी दिली आहे, माझ्या शरीरासाठी नाही. केवळ डोळ्यांनी मी क्रिकेट खेळू शकत नाही.” धोनीच्या या वक्तव्यातून त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत चिंता व्यक्त झाली आहे.
#WATCH | Chennai, Tamil Nadu | Former Indian skipper and Chennai Super Kings (CSK) icon, Mahendra Singh Dhoni says, “…I am thankful that CSK picked me because I love the whole atmosphere that’s around Chepauk, the way they appreciate the cricket and support the team. The… pic.twitter.com/PnrylMjnvY
— ANI (@ANI) August 2, 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी केवळ आयपीएलमध्येच खेळताना दिसतो. आयपीएल २०२५ मध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये १३ डावांत फक्त २४.५० च्या सरासरीने १९६ धावा केल्या. यंदाच्या हंगामात सीएसके संघाची कामगिरीही खराब राहिली आणि संघ गुणतक्त्यात तळाशी राहिला. तरीही, संघ व्यवस्थापन धोनीवर पूर्ण विश्वास दाखवत आहे. एका मुलाखतीदरम्यान धोनीने चेन्नईशी असलेल्या आपल्या खास नात्याबाबत मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – WCL 2025 : डब्ल्यूसीएलच्या मालकाचं लाईव्ह शोमध्ये अँकरला प्रपोजल, VIDEO होतोय व्हायरल
धोनीचे चेन्नईशी खास नाते –
Next 5 years I will play cricket
Thala latest interview 😂🥺❤️❤️❤️❤️ pic.twitter.com/ptPIwfuBkd— Bhuvan 🦁 (@bhuvanChari007) August 2, 2025
एमस धोनी म्हणाला, “माझे आणि चेन्नईचे नाते खूप जुनं आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीपासून हे नाते आहे. २००५ मध्ये मी चेन्नईतच माझा पहिला कसोटी सामना खेळलो. तेव्हापासून चेन्नईशी माझे खास नाते जडले. सीएसकेशी जोडले गेल्याने हे नाते आणखी दृढ झाले. आयपीएलदरम्यान मी येथे ४० ते ५० दिवस घालवतो.” चेन्नईने मला एक चांगला माणूस आणि क्रिकेटपटू बनवण्यात मोठी भूमिका बजावली आहे, असेही तो म्हणाला. चेन्नईसाठी जे चांगले आहे, ते माझ्यासाठीही चांगले आहे, असे धोनीने सांगितले. यावेळी त्यांनी सीएसके फलंदाजीच्या समस्यांबाबतही चिंता व्यक्त केली.
हेही वाचा – IND vs ENG : रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध रचला इतिहास! ९३ वर्षांत असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
सीएसकेच्या फलंदाजीबद्दल धोनी काय म्हणाला?
धोनीने सांगितले की, आयपीएल २०२५ मध्ये ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे संघाच्या फलंदाजीची लय बिघडली. पुढील हंगामात गायकवाडच्या पुनरागमनाने यात सुधारणा होईल, अशी आशा त्याने व्यक्त केली. गायकवाड पुढील हंगामात पुन्हा संघाचे कर्णधारपद सांभाळू शकतो, असेही धोनीने सूचित केले. तसेच, लिलावात काही चांगले खेळाडू संघात सामील झाल्यास फलंदाजी आणखी मजबूत होईल, असेही धोनी म्हणाले.





