#DCvsCSK : दिल्ली विरूध्दच्या विजयाचे श्रेय गोलंदाजांना – धोनी

विशाखपट्‌टनम – दिल्ली कॅपिटल्सवर मात करुन चेन्नईने दिमाखात आयपीएलच्या बाराव्या हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्याची चेन्नईची ही आठवी वेळ ठरली आहे. दिल्लीने दिलेले 148 धावांचे आव्हान चेन्नईने 4 गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. सामना संपल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चेन्नईच्या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले आहे.

गोलंदाजीदरम्यान विकेट घेत राहणे हे महत्वाचे होते. या विजयाचे श्रेय मी पूर्णपणे गोलंदाजांना देईन. नेमकं काय हवं आहे हे कर्णधार खेळाडूंना सांगू शकतो. त्यावर कस काम करायच आणि गोलंदाजी कशी करायची हे सर्व गोलंदाजांवर अवलंबून असते आणि गोलंदाजांनी त्यांची कामगिरी चोख बजावली, असे धोनी म्हणाला.

Leave A Reply

Your email address will not be published.