महिलांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या “मिसेस इंडिया’

– दीपेश सुराणा

डॉ. प्रेरणा या मूळ निगडी-प्राधिकरण येथील रहिवासी आहेत. त्यांनी आकुर्डी येथील आयुर्वेद ऍण्ड रिसर्च सेंटर येथे आयुर्वेदात बीएएमएस केले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे) येथून त्यांनी योगशास्त्रामध्ये पदविका घेतलेली आहे. 2018 मध्ये त्यांना दिल्ली येथे “मिसेस इंडिया-शी इज इंडिया’ या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील निवड चाचणी मे-2018 मध्ये झाली. स्पर्धेची अंतिम फेरी 7 जून 2018 ला दिल्ली येथे झाली. या स्पर्धेत विविध राज्यातून 45 महिला सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेमध्ये त्यांना “मिसेस इंडिया ब्युटीफुल’ हा किताब मिळाला.

या स्पर्धेमुळे एक समृद्ध अनुभव मिळाला. आत्मविश्‍वास आणि व्यक्‍तिमत्त्व विकासासाठी त्याचा खूपच फायदा झाला. घर, क्‍लिनिक आणि मुलांचा सांभाळ करताना सौंदर्य जपण्यासाठी वेगळा वेळ मिळत नव्हता. मी आयुर्वेदिक डॉक्‍टर असल्याने योग्य आहार, आयुर्वेदानुसार जीवनशैली, योगा, पंचकर्म आदींवर भर देत होते. त्यामुळे आपले सौंदर्य टिकवू शकले. पर्यायाने, सौंदर्य स्पर्धेत मला यश मिळाले, असे डॉ. प्रेरणा नमूद करतात.

सौंदर्य स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी “घरगुती हिंसाचार’ या विषयी माहिती घेतली. त्यावर व्हिडिओ क्‍लीप तयार केली. सौंदर्य स्पर्धेत यश मिळाले असले तरीही त्यांनी चित्रपट-मालिकांमध्ये न जाता आयुर्वेद डॉक्‍टर म्हणूनच कार्यरत राहण्याचे ठरविले आहे.

महिला आरोग्य हा विषय सर्वच पातळ्यांवर दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे डॉक्‍टरांनी यावर काम केले पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी ऊर्जा हेल्थकेअरमार्फत आणि डॉक्‍टरांच्या सहकार्याने विवाहित महिला डॉक्‍टरांसाठी “मेडीक्‍वीन-मिसेस महाराष्ट्र’ ही स्पर्धा भरविण्याचे नियोजन केले आहे. नोव्हेंबरमध्ये त्यासाठी निवड चाचणी होणार आहे. तर, स्पर्धेची अंतिम फेरी 11 जानेवारी 2020 ला होणार आहे. महिलांनी ताण-तणावावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. आयुर्वेद, पंचकर्म आदींच्या मदतीने महिलांना तारूण्य आणि सौंदर्य टिकविता येऊ शकते, असे मत डॉ. प्रेरणा व्यक्‍त करतात.

डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर

दिल्ली येथे गतवर्षी झालेल्या “मिसेस इंडिया-शी इज इंडिया : 2018′ सौंदर्य स्पर्धेत सौंदर्यवतीचा “ब्युटीफुल’ हा किताब पटकावणाऱ्या प्रेरणा बेरी-कालेकर यांनी आयुर्वेद डॉक्‍टर म्हणून आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. “महिला आरोग्य’ या विषयावर त्या सध्या काम करीत आहेत. योग्य आहार, आयुर्वेदानुसार जीवनशैली, योगा आणि पंचकर्म यामुळे आपण आपले सौंदर्य टिकवू शकतो, असे त्या आवर्जून सांगतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here