Mrunmayee Deshpande| अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने नुकताच आपला 37 वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. वाढदिवसानिमित्त मृण्मयीला तिच्या कुटुंबाकडून एक स्पेशल गिफ्ट देण्यात आले आहे. याचा व्हिडिओ देखील मृण्मयीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सरप्राईजचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत मृण्मयी सासरच्या घरी एन्ट्री करते, तेव्हा तिचे सासू-सासरे हातात सितार घेऊन उभे असतात. हे पाहून मृण्मयीला आनंद होतो आणि त्यावर तिचे नावही कोरलेले दिसते. सतार पाहताच मृण्मयी ती वाजवायला सुरुवात करते आणि शाळेनंतर खूप वर्षांनी सतार वाजत असल्याचे म्हणते. Mrunmayee Deshpande|
View this post on Instagram
यावेळी मृण्मयीचे आई-बाबा देखील व्हिडीओ कॉलवर उपस्थित होते. “मी खूप आनंदी आहे. मला याआधी आजोबांनी सतार दिली होती त्यामुळे ही खूप जास्त स्पेशल आहे आणि यावर माझं नावही आहे,” असे ती म्हणते. दरम्यान, या खास सरप्राइजमुळे मृण्मयी खूश असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. Mrunmayee Deshpande|
मृण्मयीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, मृण्मयी नुकतीच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात झळकली होती. यात तिने सुधीर फडके यांच्या पत्नी ललिताबाई फडके यांची भूमिका साकारली आहे. यातील तिच्या भूमिकेचे देखील अनेकांकडून कौतुक करण्यात आले.
हेही वाचा:
शशी थरूर यांच्या पीएला दिल्ली विमानतळावरून ‘अटक’ नेमकं काय आहे प्रकरण? वाचा