बाहुबलीमधून मृणाल ठाकुर “आउट’, वामिका गाबी “इन’

बॉक्‍स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम निर्माण करणारा चित्रपट म्हणजे बाहुबली. यातील प्रभासच्या अभिनयापासून सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक झाले. यात विशेष आठवणीत राहिलेली भूमिका म्हणजे शिवगामिनी. नेटफ्लिक्‍सच्या सीरीजमध्ये ही भूतिका साकारली होती मृणाल ठाकुरने. बाहुबली या चित्रपटाच्या दुसऱ्या भागानेही बॉक्‍स ऑफिसवर गल्ला जमविला. हा चित्रपटही प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतला. नुकतच या चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

“बाहुबली: बिफोर द बिगिनिंग’ असे या आगामी सीरिजचे नाव आहे. पहिल्या दोन भागात शिवगामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिला आता सीरिजमधून बाहेर काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आगामी सीरिजचे 75 टक्‍के चित्रीकरण पूर्ण झालं होतं.

परंतु मृणालचा अभिनय निर्मात्यांना आवडला नसल्याने तिला या सीरिजमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तिच्या जागी आता अभिनेत्री वामिका गाबी हिची वर्णी लागली आहे. ही अभिनेत्री या भूमिकेला योग्य त्या प्रकारे न्याय देऊ शकेल अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्‍त केली आहे. मृणालसोबत आणखीन काही कलाकारांना सीरिजमधून बाहेर काढण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.