पुणे – राज्यसेवा मुख्य परिक्षेतील वर्णनात्मक पद्धत अंमलबजावणी २०२३ ऐवजी २०२५ पासून करण्याबाबत आज पुण्यातील अल्का टॉकीज चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी डिजिटल प्रभातचे रिपोर्टर प्रीतम पुरोहित यांनी आंदोलनातील अनेक विद्यार्थांशी संवाद साधला आहे.
यावेळी डिजिटल प्रभातचे रिपोर्टर प्रीतम पुरोहित यांनी उपस्थित विद्यार्थांशी त्यांच्या मागण्यांबाबत विचारले असता ते म्हणाले,’एमपीएससीच्या अभ्यासक्रम अचानक बदल्यामुळे अभ्यास कसा करायचा हा प्रश्न सर्व विद्यार्थी वर्गापुढे उभा आहे. आम्हाला न्याय द्या. असं म्हणत विद्यार्थांनी मागणी केली आहे की हा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा.
रोहिणी थोरात, सोलापूर ( एमपीएससी विद्यार्थीनी)
‘मी गेल्या दीड वर्षांपासून एमपीएससीचा अभ्यास करते आहे. आता अचानक अभ्यासक्रम बदललेल्यामुळे अभ्यास कसा करावा असा गोंधळ माझ्यासह एमपीएससी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यां पुढे पडतोय. नवीन अभ्यासक्रमातील अभ्यास करणे म्हणजे पुन्हा पुढचे दीड वर्ष जाणार…यात मुलांचे ठीक आहे पण मुलींना घरून वेळ दिला जात नाही घरचे लग्नासाठी सतत बोलत असतात. जर हा अभ्यासक्रम २०२५ मध्ये लागू केला तर आम्ही तोवर एमपीएससीचा आहे तो अभ्यासक्रम करून निघून जाऊ.. म्हणून आमचा अभ्यासक्रम बदलाच्या निर्णयावर विरोध नाही पण आता हा निर्णय न घेता २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा.’
स्नेहल गुंजाळ, अहमदनगर ( एमपीएससी विद्यार्थीनी )
‘राज्यसेवा मुख्य परिक्षेतील वर्णनात्मक पद्धत अंमलबजावणी २०२३ ऐवजी २०२५ ला घेण्यात यावा कारण गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही सर्व अभ्यास करतोय आणि आता परीक्षेला फक्त चार महिन्याचा कालावधी असतांना आम्ही अभ्यास कसा करावा. म्हणून अभ्यासक्रमाचा निर्णय योग्य असल्या तरी हा निर्णय २०२५ मध्ये घेण्यात यावा.’