पुणे : यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी परीक्षा घेण्याचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी नव्या वर्णनात्मक पद्धतीचा अभ्यासक्रम 2025 नंतर लागू करण्यासंदर्भात रोहित पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले असून त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत.
रोहित पवार यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की,’राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी #UPSC च्या धर्तीवर नवी वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू करण्यास परिक्षार्थींचा विरोध असून ही पद्धती २०२५ नंतर लागू करण्याची विनंती मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली. तसंच लिपिक व टंकलेखक भरती परिक्षेची गुणवत्ता यादी विभागनिहाय जाहीर न करता IBPS च्या धर्तीवर सर्व विभागांची एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर करण्याची मागणीही यावेळी केली.याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांना लक्ष घालण्याच्या सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्या.’
रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट