पुणे – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 666 पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संयुक्त पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी होत आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
“एमपीएससी’ने काही दिवसांपूर्वीच राज्यसेवेची जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षाच्या जाहिरातीची उमेदवारांमध्ये प्रतिक्षा होती. त्याबाबत उमेदवारांकडून “एमपीएससी’ला समाजमाध्यमांद्वारे विचारणाही करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर “एमपीएससी’ने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
सामान्य प्रशासन विभागातील 100 सहायक कक्ष अधिकारी पदे, वित्त विभागातील राज्य कर निरीक्षक 190 पदे, गृह विभागातील पोलिस उपनिरीक्षक 376 पदांसाठी पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.