पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत समाजकल्याण अधिकारीसाठी परीक्षा आणि बॅंकेतील क्लार्कपदासाठी परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत. क्लार्क पदासाठी यापूर्वीच आयबीपीएसच्या वतीने परीक्षेची तारीख २५ आॅगस्ट रोजी जाहीर केली आहे.
त्याच दिवशी एमपीएससीने समाजकल्याण अधिकारी पदासाठी परीक्षा ठेवली आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी होत आहे.
समाजकल्याणची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने एमपीएससीने परीक्षेची तारीख जाहीर केली. तरीही लिपिक पदाच्या परीक्षा या दिवशी घेण्यात येत आहे. ही बाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबत पोस्ट करीत एमपीएससीला धारेवर धरले.
मराठा आरक्षणासंदर्भात योग्य त्या बाबींची वेळीच तरतूद व पूर्तता न केल्यामुळे आधीच तीन वेळेस ही परीक्षा पुढे ढकलण्यायत आली. आता ज्या दिवशी अन्य परीक्षा आहेत, त्याची परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
ही बाब विद्यार्थ्यांनी एमपीएससीला कळविली होती. त्यानंतर त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आता नाना पटोले यांनी राज्य सरकारने सर्व प्रकाराची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे