मॉस्को : रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी मांडलेल्या घटनेतील सुधारणांच्या विधेयकाला खासदारांनी एकमताने मंजूरी दिली आहे. विधेयक मांडल्यानंतर केवळ दोन तासांच्या चर्चेनंतर या विधेयकाला मंजूरी देण्यात आली. संसदेत दुरुस्ती विधेयक सादर केल्याच्या अवघ्या तीन दिवसानंतर खालचे सभागृह डूमा येथे उपस्थित सर्व 432 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले.
हे ऐक्याचे एक शक्तिशाली प्रदर्शन होते, असे मत डूमाचे सभापती व्याचेस्लाव व्होलोडिन यांनी मतदाना नंतर सांगितले. 11 फेब्रुवारी रोजी या दुरुस्ती विधेयकाचे दुसरे मुख्य वाचन अपेक्षित आहे. त्यानंतर या विधेयकाचे तिसरे वाचन होईल. परंतु क्रेमलिन-निष्ठावंत खासदारांच्या संसदेचे वर्चस्व असल्याने यास जास्त धक्का बसण्याची शक्यता नाही.
पुतीन यांनी गेल्या बुधवारी राज्यघटनेतील सुधारणांचे आवाहन केले आणि त्यानंतर सरकारचा राजीनामा घेतला. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी नवीन पंतप्रधान व मंत्रिमंडळाची नेमणूक झाली.