नगर – विधानसभेच्या पार्श्वभूमिवर संघटीत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा धडाका जिल्हा पोलीस प्रशासनाने धरला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील 7 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यामधील नगर शहरातील तीन व्यक्तीचा समावेश होता. त्यात आनखीभर टाकत तीन व्यक्तीविरोधात कारवाईचे प्रस्ताव जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचेकडे पाठविण्यात आले आहे. अशी माहिती शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी सांगितले.
सार्वजनिक सुव्यवस्थेला बांधा पोहचून दुकश्राव्य कृत्य करणाऱ्या शहरातील तीन गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये समदखान वहाब खान, बाबा उर्फ बाबा अंडा सेहबाज जाफरखान व भुर्या उर्फ मुजीब अझीज खान या तीन धोकादायक व्यक्तीचा समावेश आहे. तर आजून शहरातील तीन व्यक्ती विरोधात प्रस्ताव प्रस्तावित आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी जिल्ह्यातील संघटीत गुन्हेगाराविरुध्द एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे सुचित केले होते. त्यानुसार शहरातील झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर, दुकश्राव्य कलाकृती चे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.