खासदार संजय राऊत उद्या वडगाव शेरीत; शिवसेनेकडून शहर भाजपला चपराक

पुणे – ” तर कोथळा बाहेर काढू हे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले कथित विधान धमकवणारे आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी,’ अशी मागणी करत “राऊत यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही,’ असा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दोन आठवडयांपूर्वी दिला.

त्यानंतर, शहर शिवसैनिकांनाही खासदार राऊत यांना अडवूनच दाखवा असा इशारा भाजपला दिला होता. त्यानंतर, खासदार राऊत उद्या ( रविवारी ) पुण्यात येत असून भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक ज्या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करत होते. त्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातच खासदार राऊत हे पदाधिकारी मेळावा घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेने भाजपला जोरदार चपराक दिल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.

खासदार राऊत यांनी केलेल्या वक्‍तव्या नंतर शहर भाजपच्या वतीने खासदार राऊत यांच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात ( 6 स्पटेंबर ) रोजी यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता, यावेळी मुळीक यांनी “संजय राऊत हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून राजकारण करतात. ते फिल्डवर कधीही काम करत नाहीत. त्यांच्यात निवडणूक लढवण्याची हिंमत नाही.

कोथळा बाहेर काढू ही एक प्रकारे धमकी आहे, ती आम्ही खपवून घेणार नाही. असा इशाराही दिला होता. त्यानंतर मुळीक यांच्या वक्‍त्व्यांचा समाचार घेत; शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांना पुण्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले असून; त्यांना अडविणाऱ्याचा शिवसेना स्टाईल समाचार घेऊ असे सांगत, भाजपला थेट आव्हान दिले होते. त्यानंतर दोन आठवडयात खासदार राऊत पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत महापालिका निवड्‌णूकांच्या तोंडावर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.