नायपितॉ (म्यानमार) – म्यानमारच्या संसदेच्या वरच्या सभागृहाचे सदस्य म्हणून नुकतेच निवडून आलेले शान प्रांतामधील सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसीचे सदस्याचे शनिवारी सायंकाळी गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
म्यानमारच्या शान राज्यातील क्युकमे येथील त्यांच्या घरी ही घटना घडली. नवनिर्वाचित खासदार हित्के झॉव यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून पळ काढला. पक्षाने अधिकाऱ्यांना घटनेची लवकरात लवकर चौकशी करण्यास सांगितले आहे, असे “एनएलडी’चे प्रवक्ते म्यो नंट यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
म्यानमारमधील निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराला पक्षाने भविष्यासाठी वाईट असल्याचेही पक्षाने म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या 2020अ च्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी “एनएलडी’ने केंद्र, राज्य आणि प्रादेशिक विधानसभेच्या 1,177 पैकी 920 जागा जिंकून सत्ताधारी एन.एल.डी.ने जोरदार विजय मिळविला आहे.