जबलपूर – सून व सासऱ्याच्या अनैतिक संबधातून संतापलेल्या पतीने दोघांचीही कुऱ्हाडीने तुकडे करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यात गोकलाहार गावात घडला आहे.
संतोष लोधी, वय 35 असे आरोपी मुलाचे नाव असून वडील अमन लोधी, वय 65 आणि पत्नी कविता लोधी, वय 32 असे हत्या करण्यात आलेल्या वडील व पत्नीची नावे आहेत. आरोपी संतोष यास पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या वडिलांना आणि पत्नीला आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर मुलाचा राग अनावर झाला आणि त्यातून त्याने हे टोकाचे पाऊस उचलले. या घटनेनंतर आरोपीने स्वत: दोघांचीही हत्या केल्यानंतर याची माहिती आपल्या काकांना स्वत: घरी जाऊन दिली. त्यानंतर कुऱ्हाड घेऊन आपल्या घराच्या दरवाज्यात बसून राहिला. आरोपी संतोष लोधी आणि कविता यांचे १५ वर्षाआधी लग्न झाले होते. त्यांना एक १४ वर्षांचा मुलगा आणि १२ वर्षांची मुलगीही आहे.
या घटनेबाबत पोलीस म्हणाले की, चौकशी दरम्यान संतोषने पोलिसांना सांगितले की, घरात वडील आणि पत्नीला त्याने शारीरिक संबंध ठेवताना पाहिले होते. हा सगळा प्रकार पाहिल्यावर तो चांगलाच संतापला होता. तो रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याने दोघांचीही हत्या केली.
आरोपीच्या एका नातेवाईकाने पोलिसांना या घटनेची सूचना दिली. पोलिसांनी एका रूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात दोन मृतदेह आढळून आले. तर आरोपी घराच्या उंबरठ्यावर बसला होता. अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक एस.एस.बघेल यांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.