पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि राष्ट्रबांधणी’ या पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रवेश घेणार आहेत.
याबाबत त्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेतली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विभागप्रमुख डॉ. विजय खरे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.