मुंबई : शिवसेना महायुतीच्या उमेदवार शायना एन सी यांच्याबाबत शिवसेना युबीटी पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह विधान केले होतं. त्यावरून, राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे. या प्रकरणी खासदार अरविंद सावंत यांच्याविरुद्ध नागपाडा पोलीस ठाण्यात भादंवि 79, कलम 356 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरविंद सावंतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
मला कुठलीही नोटीस न देता गुन्हा दाखल केलाय, त्याबद्दल पोलिसांचं कौतूक. यापूर्वी, पोलिस स्थानकात गोळी झाडली गेली, ठाण्यात अत्याचार झाला, महिला पत्रकाराला काय काय बोलले, तेव्हा गुन्हा दाखल झाला का? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. तसेच, सत्तेत असाल तर काही करा गुन्हा दाखल होणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
मला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचलं गेलंय. ती माझी मैत्रिण होती, मी तिचा अपमान कशाला करेल. ही ढोंगी लोकं आहेत, तुमच्या पक्षात सत्तेत असाल तर काहीही करा असं आहे हे. तुम्हाला एथिक्स नाही, चरित्र नाही, तुम्ही भ्रष्ट लोकं आणि ते आरोप करतात तेव्हा वाईट वाटतं, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.