रिओ दि जानेरे – ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो येथील सॅंटोस ड्युमॉन्ट विमानतळावर विमानांच्या वेळेची माहिती देणाऱ्या डिस्प्ले स्क्रीनवर अचानक अश्लील चित्रपट सुरु झाला. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर उपस्थित लोकांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले. प्राथमिक तपासात हॅकर्सनी विमानतळाची डिस्प्ले स्क्रीन हॅक करून ही घटना घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे.
या संपूर्ण घटनेबाबत, विमानतळ प्राधिकरण इन्फ्राएरोने सांगितले की त्यांनी “रिओ डी जनेरियो येथील विमानतळाच्या इलेक्ट्रॉनिक ‘डिस्प्ले स्क्रीन’ हॅक झाल्याबद्दल पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावर प्रदर्शित केलेल्या माहिती सेवा ही दुसर्या कंपनीची जबाबदारी आहे, ज्याला ही माहिती प्रदान केली गेली आहे.”
प्रवाशांनी झाकले लहान मुलांचे डोळे –
विमानतळाच्या डिस्प्ले स्क्रीनवर अचानक अश्लील चित्रपट सुरू होताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. घाईघाईत काही लोकांनी आपल्या मुलांचे डोळे झाकायला सुरुवात केली, तर काही लोकांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.
विमानतळ प्राधिकरणाने बंद केले डिस्प्ले –
डिस्प्ले स्क्रीनवर अश्लील चित्रपट दिसल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने तात्काळ कारवाई केली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. यावर अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेत विमानतळावरील सर्व डिस्प्ले स्क्रीन बंद करण्याचा निर्णय घेतला.