MovieReview : फुल्ल टू मनोरंजक

एकदा एक चित्रपट चालला की त्याचा सिक्वेल आणयचा हा पायंडा पाडलेल्या दिग्दर्शकांमध्ये आघाडीचे नाव असलेले दिग्दर्शक अशी इंद्रकुमर यांची अलिकडे ओळख निर्माण झाली आहे. ’मस्ती’ च्या तीन भागानंतर आत दिग्दर्शक इंद्रकुमार त्यांच्या ’धमाल’ सिरिज मधील पुढचा भाग ’म्हणजेच ’टोटल धमाल’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटाचे आकर्षण आहे अनिल कपुर आणि माधुरी दिक्षित ही तब्बल १८ वर्षानी एकत्र काम करणारी जोडी आणि संजय दत्तच्या जागी अजय देवगणची एन्ट्री, हा चित्रपट नावाप्रमाणे पडद्यावर धमाल करतो.

’टोटल धमाल’ चित्रपटाची कथा गुड्डू (अजय देवगण), पिंटू ( मनोज पाहवा) आणि जॉनी( संजय मिश्रा) यांच्यापासून सुरु होते. एकेदिवशी हे तिघे पोलिस कमिशनरला लुबाडतात  अर्थात तो पैसा  दोन नंबरचाच आहे, दरम्यान  अचानकपणे कोट्यावधी रुपये मिळाल्यानंतर पिंटूला मोह होतो आणि तो गुड्डू आणि जॉन यांची दिशाभूल करुन पैशासह पळ काढतो आणि सुरक्षित ठिकाणी ते दडवून ठेवतो. मात्र गुड्डू आणि जॉन पिंटूचा शोध घेतात. तोपर्यंत या पैशाविषयीचं गुपित अविनाश ( अनिल कपूर), बिंदू (माधुरी दीक्षित),लल्लन (रितेश देशमुख), झिंगुर (पितोबश त्रिपाठी), आदित्य (अर्शद वारसी) आणि मानव (जावेद जाफरी) यांना समजतं. त्यानंतर हे पैसे मिळविण्यासाठी या साऱ्यांची चढाओढ सुरु होते आणि त्यातून घडते या साऱ्यांची ‘टोटल धमाल’ अनुभवण्यासाठी हा चित्रपट बघायला हवा.

इंद्रकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात  यशस्वी ठरला आहे. ‘धमाल’, ‘डबल धमाल’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. आणि  अपेक्षा पूर्ण होतात.  चित्रपटाचा पूर्वाध पात्रांची ओळख करून देण्यातच घालवला आहे. मात्र उत्तरार्धात चित्रपट वेगाने पुढे सरकतो. पूर्वाधापेक्षा उत्तरार्ध जास्त मनोरंजक वाटतो.

कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर या चित्रपटात अजय देवगणने वठविलेली भूमिका पाहता धमाल फ्रेंचाइजीच्या ‘धमाल’मधील संजय दत्तची आठवण आल्याशिवाय राहत नाहीत. त्यातच अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या जोडीने त्यांच्या धमाल केमिस्टीमुळे प्रेक्षकांना खळखळून हसविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच रितेश देशमुखने साकारलेला उत्तर भारतीय  धम्माल आणतो.  संजय मिश्रा, बोमन इराणी याम्नी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.  जावेद जाफरी, अर्शद वारसी यांनीही आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. तर सोनाक्षी सिन्हा ‘मुंगडा’ या गाण्यातून भलतीच भाव खाऊन गेली आहे.

टोटल धमाल’ बद्दल एकंदरीत सांगायचे तर प्रेक्षकांना हसवत असताना हा चित्रपट मध्येच काहीसा मंद झाला आहे, तसेच अनेक ठिकाणी  पुढे काय होईल याचा अंदाज प्रेक्षकाला साजह बांधता येतो  त्यामुळे हा चित्रपट प सरासरी मनोरंजन करताना दिसून येतो. मात्र धमाल फ्रेंचाइजीच्या पहिल्या दोन चित्रपटांच्या तुलनेपेक्षा टोटल धमाल म्हणावं तसं मनोरंजन करण्यात  काहीसा कमी पडलेला असला तरी कलाकारांचा अभिनय आणि मेंदूला जास्त ताण न देता फक्त मनोरंजनासाठी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

चित्रपट – टोटल धमाल

निर्मिती – आनंद पंडित, इंद्रकुमार, अशोक ठाकेरिया

दिग्दर्शक – इंद्रकुमार

संगीत – गौरव- रोशन

कलाकार – अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अजय देवगण, रितेश देशमुख, बोमन इराणी, संजय मिश्रा, जावेद जाफरी, अर्शद वारसी, मनोज पाहावा

रेटींग – ***

– भूपाल पंडित

[email protected]

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×