साकळाई प्रश्‍नी सोमवारी धरणे आंदोलन

मांडवगण येथील बैठकीत शेतकऱ्यांचा निर्णय

श्रीगोंदा – श्रीगोंदा व नगर तालुक्‍यांतील तब्बल 35 गावांच्या पाण्याबाबत आस्थेचा विषय असलेल्या साकळाई योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईत आझाद मैदानात सोमवारपासून (दि.24) धरणे आंदोलन करण्याचा घेण्यात आला. श्रीगोंदा तालुक्‍यातील मांडवगणमधील बोरुडे मळा येथील मारुती मंदिरात शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

आश्‍वासने देऊनही पुढे काहीच कारवाई होत नसल्याने मुंबई येथे अधिवेशनाच्या दरम्यान येत्या 24 जून रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने योजनेची अधिसूचना काढली नाही, तर 9 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचे निवेदन धरणे आंदोलनाच्या दिवशी शासनाला देण्यात येणार आहे. प्रत्येक गावातून लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीसाठी विक्रम शेळके, धनंजय शिंदे, शिवाजी वाघमारे, शिवा म्हस्के, युवराज पडोळकर, हर्षवर्धन शेळके, जयसिंग खेंडके, दादासाहेब जगताप, महेश शिंदे, गोवर्धन कार्ले, राजेंद्र लोखंडे, कारभारी बोरुडे, शिवाजी शेलार, बापूराव ढवळे, डॉ. बापू नलगे, अक्षय धोंडे, संतोष लाटे, राजेंद्र बोरुडे, यशवंत लोखंडे, दिलीप शेळके, कोतकर, नवनाथ पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.