वाघोली येथे महामार्गावर नाभिक संघटनेचे आंदोलन

वाघोली (पुणे) – राज्य शासनाच्या हॉटेल, बारसह सलूनची दुकाने बंद ठेवण्याचे जाहीर केल्याने पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथे नाभिक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

हातघाईला आलेल्या सलून व्यवसायिकांचे कंबरडे मोडले असतानाच दुकाने बंद बाबत राज्य शासनाने भूमिका घेतल्याने केसनंद फाटा येथे सलून व्यावसायिकांनी रास्ता रोको करीत आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची पळापळ झाली. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. सलून बंद करणार नसल्याची भूमिका संघटनेच्या वतीने घेण्यात आली.

वाघोलीसह जिल्ह्यातील अनेक व्यावसायिक नागरिकांना कडक निर्बंध, आणि लॉकडाऊनचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
– राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच, वाघोली

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.