सरकार विरोधात ‘आरोग्य’पूर्ण हल्लाबोल

पुणे- महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग आशा व गटप्रवर्तक संघटना आणि पुणे जिल्हा आशा संघटना यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या वेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने बेमुदत काम बंद आंदोलन सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मानधनात वाढ करण्यासाठी जून महिन्यात मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते.

आशा स्वयंसेविका -गटप्रवर्तक यांच्या मानधन प्रश्नाबाबत शासनस्तरावर जीआर काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

Posted by Digital Prabhat on Monday, 16 September 2019

यावेळी मानधन वाढीचा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते.सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यात आला. राज्य कृती समितीच्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात येत असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील आशा कर्मचारी व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राज्य गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे सचिव नीलेश दातखिळे, जयश्री धायबर, शुभांगी जगताप व सुनंदा जोशी यांच्या मार्गदर्शनखाली हे आंदोलन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)