पुणे – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यभर मराठा क्रांती मोर्चा व संलग्न संघटनांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. पुण्यातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. यावेळी काळे झेंडे दाखवत आणि घोषणाबाजीद्वारे आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदवला आहे.