काठमांडू – नेपाळ आणि चीनने संयुक्तपणे एव्हरेस्टची नेमकी उंची किती आहे याची आधुनिक साधनांनी मोजणी करून त्याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यानुसार एव्हरेस्टची नेमकी उंची 8848.86 मीटर इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारताने सन 1954 साली एव्हरेस्टची उंची मोजली होती. त्यापेक्षा ही उंची 86 सेंटीमीटरने जास्त भरली आहे. त्यानंतरच्या काळातही जगातल्या सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या या पर्वताची उंची मोजण्याचे काम झाले आहे. त्या प्रत्येकवेळी त्यात काही ना काही फरक पडलेला आढळून आला आहे.
8848.86 metres is the newly-measured height of Mount Everest, Nepal's Foreign Minister announces. pic.twitter.com/Fnxh1liY98
— ANI (@ANI) December 8, 2020
या आधी चीनने एकट्याने सन 1975 आणि 2005 मध्ये एव्हरेस्टची उंची मोजली होती. त्यावेळी ती अनुक्रमे 8848.13 मीटर आणि 8844.43 मीटर इतकी असल्याचे नमूद करण्यात आले होते.
चीन आणि नेपाळ यांच्यातही सीमा प्रश्न होता. पण त्यांनी तो 1961 मध्ये सोडवला आणि दोन्ही देशांतील सीमा एव्हरेस्टच्या शिखरावरून जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या दोन्ही देशांनी प्रथमच एव्हरेस्टची उंची मोजण्याचा हा संयुक्त प्रकल्प हाती घेतला.