वाघोली (प्रतिनिधी) – गिरिजा लांडगे हिने युरोप खंडातील माऊंट एल्ब्रुस हे सर्वोच्च शिखर (20000 हजार फूट) सर्वात लहान वयात पार केल्याबद्दल वाघोली गावचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील,अतुल शिंदे, वाघोली तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सचिन काळे यांनी तिचे अभिनंदन करून तिचा सत्कार केला आहे.
नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन व त्यांचा सत्कार करून पाठबळ देऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी केले आहे.