मौनी रॉय म्हणजे राखी सावंत

भारतच्या प्रिमिअरला आलेल्यांमधील मौनी रॉयच्या लुकची सर्वात जास्त चर्चा झाली. कारण मौनीच्या बदललेल्या लुकबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. तिच्या चेहरेपट्टीमध्ये एवढा मोठा फरक कसा पडला, हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्‍न होता. मात्र याचा एक अंदाज लवकरच सगळ्यांच्या समोर मांडला गेला. मात्र तिच्या या लुकमुळे तिचे कौतुक होण्याऐवजी तिला ट्रोल केले जाण्याचे प्रमाणच जरा जास्त होते. या लुकमुळे तिच्या चेहऱ्यातला गोंडसपणा निघून गेला आणि एकप्रकारचा कृत्रिमपणा आल्यासारखे जाणवायला लागले आहे.

“भारत’च्या प्रिमिअरला जाताना मौनीने निओन ग्रीन जॅकेट आणि काळा ड्रेस घतला होता. पण तिच्यापेक्षा तिच्या ओठांनीच जरा जास्त लक्ष वेधून घेतले. तिच्या या ओठांच्या ठेवणीमध्येच काही तरी बदल झाला, हे सेलिब्रिटी फोटोग्राफर्सच्या लक्षात आले. थोड्यावेळाने नेटवर पोस्ट झालेल्या या फोटोंवर अक्षरशः ट्रोलर्सनी शेरेबाजीचा कहर केला. “फेल झालेली प्लॅस्टिक सर्जरी’ असेही काहींनी म्हटले. काही नेटिझननी तिला “प्लॅस्टिकची मौनी’ असेच म्हणायला सुरुवात केली आहे.

इन्स्टाग्रामवरती काही जणांनी तिची तुलना थेट राखी सावंत आणि किंग ऑफ पॉप म्युझिक मायकेल जॅक्‍सनबरोबर केली. याशिवाय काहींनी या ट्रोलिंगऐवजी तिचे कौतुकच केले. त्यामुळे ती थोडी सुखावली असेल. टीकेकडे लक्ष देऊ नकोस. तू छान दिसते आहेस, असे काहींनी म्हटल्याने तिला थोडा दिलासा मिळाला.

“गोल्ड’मधून पदार्पण करणाऱ्या मौनीने टीव्हीवरही जम बसवला आहे. मौनी आता “ब्रम्हास्त्र’ आनि “मेड इन चायना’मध्ये दिसणार आहे. पण तिथला तिचा लुक प्लॅस्टिक सर्जरीच्या आगोदरचा आहे की नंतरचा ते माहिती नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.