Mouni Roy Harassment : अभिनेत्री मौनी रॉयने हिंदी मालिकांसह चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिचा देशभरात मोठा चाहता वर्ग देखील आहे. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. हरियाणातील करनाल येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान तिच्या सोबत झालेल्या गैरवर्तनाबाबत मौनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. मौनी रॉयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमधील काही व्यक्तींनी अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप केला आहे. एका वयस्कर माणसाने तिच्याकडे बघून अश्लील हावभाव केल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. मौनी रॉयची पोस्ट – मौनीने लिहिलं की, “काल करनालमध्ये एक कार्यक्रम होता आणि तिथे उपस्थित काही पाहुण्यांच्या वागणुकीमुळे मी खूप अस्वस्थ झाले. विशेषतः विशेषत: दोन अंकल जे आजोबांच्या वयाचे असतील. इव्हेंट सुरु झाला आणि मी स्टेजवर जात होते तेव्हा परिस्थिती अस्वस्थ करणारी झाली. फोटो काढण्याच्या नावाखाली काही पुरुषांनी माझ्या कमरेवर हात ठेवला. मी तात्काळ त्यांना हात हटवण्यास सांगितलं, पण त्यांना ते आवडलं नाही,” असं तिने पोस्टमध्ये नमूद केलं. Mouni Roy Harassment : मौनी रॉयने पोस्ट शेअर करत व्यक्त केला संताप “स्टेजवर गेल्यानंतर तर अजूनच जास्त किळसवाणा प्रकार घडला. ते दोन्ही काका माझ्या समोर उभे राहून अश्लील हावभाव करायला लागले. अश्लील कमेंट करत होते आणि माझं नाव घेऊन मला चिडवत होते. मला हे समजल्यावर आधी मी त्यांच्याकडे बघून प्रेमाने त्यांना असं करु नका सांगितलं. त्यानंतर त्यांनी माझ्यावर गुलाब फेकले. मी माझ्या परफॉर्मन्सच्या मध्येच एक्झिटकडे गेले पण परत येऊन परफॉर्मन्स पूर्ण केला. पण ते तेवढ्यावर थांबले नाहीत आणि कोणीही त्यांना तिथून हटवलं नाही. जर हे माझ्यासोबत घडलं तर कोणत्याही मुलीसोबत घडत असेल. Mouni Roy Harassment : Raju Patil : राज ठाकरे म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीत जे सुरू आहे त्याची शिसारी; आता राजू पाटलांची प्रतिक्रिया समोर म्हणाले… ….अशा प्रकारे लोक आम्हाला त्रास देतात हे दुर्दैवी आणखी एक गोष्ट म्हणजे स्टेज उंचीवर होता आणि हे दोन अंकल खालच्या अँगलने व्हिडीओ घेत होते. कोणीतरी त्यांना थांबवलं तर त्यांनी त्यालाही शिव्या दिल्या. माझं आपल्या देशावर प्रेम आहे, इथल्या माणसांवर आहे पण अशी माणसं? हे असे पुरुष? त्यांच्या कुटुंबातील महिलांसोबत कोणी असं वागलं असतं तर त्यांनी ते सहन केलं असतं का? Mouni Roy Harassment : या प्रसंगावर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. आम्ही कलाकार अशा इव्हेंट्समध्ये जातो नवरा नवरीला शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासोबत सेलिब्रेट करतो. पण तिथे अशा प्रकारे लोक आम्हाला त्रास देतात हे दुर्दैवी आहे.” या घटनेनंतर मौनीने संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. Mouni Roy Harassment : हेही वाचा: US-Greenland Tensions : ट्रम्पची नजर ग्रीनलँडवर ! व्हाईट हाऊसकडून पेंग्विनचा AI फोटो शेअर ; जाणून घ्या नेमकं प्रकरण