नेमबाजीत मुदगील व बाबुटाला सुवर्णपदक

नवी दिल्ली – अर्जुन बाबुटा व अंजुम मुदगील यांनी सरदार सज्जनसिंग सेठी स्मृती मास्टर्स नेमाबाजी स्पर्धेतील 10 मीटर्स एअर रायफल मिश्र विभागात सोनेरी वेध घेतला.

बाबुटा व मुदगील यांनी अंतिम सामन्यात मेहुली घोष व अभिनव शॉ यांचा 16-12 असा पराभव केला. ब्रॉंझपदकासाठी झालेल्या लढतीत आयोनिका पॉल व अखिल शेरॉन यांनी आयुषी गुप्ता व सौरभकुमार यांच्यावर 16-10 असा विजय मिळविला.

अंजुमने या स्पर्धेतील एअर रायफलमध्ये विजेतेपद मिळविले होते. तिने अंतिम फेरीत मेहुलीवर निसटता विजय मिळविला होता. तिने जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते. तसेच तिने 2020 च्या ऑलिंपिक स्पर्धेची पात्रताही पूर्ण केली आहे. ऑलिंपिकपटू गुरप्रीतसिंगने येथील 25 मीटर्स सेंटर फायर पिस्तूल प्रकारात सोनेरी वेध घेतला. त्याने या प्रकारात 585 गुणांची नोंद केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.