Motorola Edge 50: मिड-रेंज स्मार्टफोन शोधणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मोटोरोला कंपनीचा लोकप्रिय स्मार्टफोन मोटोरोला एज ५० सध्या मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वर या फोनच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे, त्यामुळे आता हा फोन २२ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतो. (Motorola Edge 50) लॉन्चवेळी या फोनची किंमत २७,९९९ रुपये होती (८GB RAM आणि २५६GB स्टोरेज व्हेरिएंट). मात्र सध्या सुमारे ६,००० रुपयांचा थेट डिस्काउंट मिळत असल्यामुळे किंमत २१,९९९ रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय बँक ऑफर्सद्वारे आणखी १,१०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. त्यामुळे ही डील बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरते. ज्यांना एकरकमी पैसे देणे शक्य नाही, त्यांच्यासाठी EMI चा पर्यायही उपलब्ध आहे. हा पर्याय सुमारे १,०७८ रुपयांपासून सुरू होतो. तसेच, जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर २०,००० रुपयांपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो, मात्र त्याची किंमत तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असते. फीचर्सच्या बाबतीत मोटोरोला एज ५० खूपच दमदार आहे. यात ६.६७ इंचाचा Super HD+ 1.5K pOLED डिस्प्ले दिला आहे, जो खूपच ब्राइट आणि क्लिअर व्हिज्युअल्स देतो. त्यामुळे व्हिडिओ पाहणे, गेमिंग करणे किंवा रोजचा वापर करताना प्रीमियम अनुभव मिळतो. Motorola Edge 50 Neo परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन १ अॅक्सेलरेटेड एडिशन प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी उत्तम मानला जातो. यासोबत १२GB पर्यंत RAM आणि ५१२GB पर्यंत स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास, हा फोन फोटोग्राफीसाठीही खास आहे. यात ५०MP Ultra Pixel प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यामध्ये Sony LYTIA 700C सेन्सर आणि OIS सपोर्ट आहे. त्याशिवाय १३MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि १०MP टेलिफोटो लेन्स दिले आहेत. त्यामुळे दूरचे फोटोही स्पष्ट आणि डिटेलमध्ये कॅप्चर करता येतात. सेल्फीसाठी ३२MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. Motorola Edge 50 बॅटरीच्या बाबतीतही हा फोन मजबूत आहे. यात ५,०००mAh बॅटरी दिली असून ती सहज दिवसभर टिकते. यासोबत ६८W TurboPower फास्ट चार्जिंग आणि १५W वायरलेस चार्जिंग सपोर्टही मिळतो, जे या किमतीत मोठे प्लस पॉइंट मानले जाते. एकूणच, सध्याच्या ऑफरमध्ये मोटोरोला एज ५० हा एक ऑलराउंडर स्मार्टफोन ठरतो. कमी किमतीत प्रीमियम डिस्प्ले, दमदार कॅमेरा, चांगली बॅटरी आणि फास्ट चार्जिंग मिळत असल्यामुळे ही डील खरेदीसाठी योग्य पर्याय मानली जात आहे. Motorola Edge 50