हेमंत मोरेचे आंतरराष्ट्रीय मोटारसायकल स्पर्धेत यश

वानवडी – हेमंत मोरे यांनी नुकत्याच झालेल्या डेझर्ट स्ट्रॉम रॅली 2019 स्पर्धेत यश मिळवले आहे. देश-विदेशातून स्पर्धक रॅलीमध्ये सहभागी होतात. या स्पर्धेची खासियत म्हणजे ही स्पर्धा संपूर्ण राजस्थानच्या वाळवंटात भरवली जातेँ तेथील तापमान 45 ते 50 डिग्रीपर्यंत असते. त्यामुळे गाडी नादुरुस्त होण्याचे चान्सेस जास्त असतात. तसेच शरीराचे डिहायड्रेशनही सर्वात मोठी समस्या असते. या समस्येमुळे पहिल्याच दिवशी 50 ते 60 टक्के स्पर्धक हे स्पर्धेतून बाहेर पडतात आणि शेवटच्या टप्प्यात 10 टक्के स्पर्धक स्पर्धा पूर्ण करतात.

ही स्पर्धा गेल्या सतरा वर्षांपासून भरवली जात आहे. यात नॅशनल लेवलच्या स्पर्धत प्रथमच भाग घेऊन यश संपादन केले आहे. तसेच रॉयल इनफिल्डची बुलेट चालवून हेमंतने द्वितीय क्रमांक मिळवून इतिहास रचला आहे कारण आतापर्यंत एकाही स्पर्धकाने बुलेट वापरली नव्हती. बुलेट कंपनीने त्याची विशेष दखल घेतली गेली. हेमंत हा मूळचा वडझिरे ता. पारनेर येथील असून तो मॅकेनिकल इंजिनिअर आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×