पुणे – राज्यातील परिवहन विभागातील मोटार वाहन अधिकारी संघटनेने प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 3 दिवसांचे वेतन (सुमारे 1 कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. त्या व्यतिरिक्त काही सभासदांनी उत्स्फूर्तपणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी असलेल्या खात्यामध्ये भरीव रक्कम या अगोदरच हस्तांतरित केली आहे.
यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत सुपूर्द केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये,यासाठी ही मदत देण्यात येत असल्याचे मोटार वाहन अधिकारी संघटनेने जाहीर केले.