छत्रपती संभाजीनगर – मोटार वाहन विभागासाठी महाराष्ट्र शासनाने 23 सप्टेंबर 2022 रोजी सुधारित आकृतीबंधाचा शासन निर्णय पारीत केला आहे. दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे तरी सदर आकृतीबंधाच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे राज्यातील मोटार वाहन विभागातील सर्व कर्मचारी भयभीत व भवितव्याबाबत चिंतित झाली आहेत.
याकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात राज्यातील सर्व मोटार वाहन विभागातील कर्मचारी २४ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकरणार आहेत. याबाबत त्यांनी राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आकृतीबंधाची योग्यरित्यापूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी न करता कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरेल तसे शासनाच्या निर्णयास छेद देणाऱ्या महसूल विभागीय बदल्यास संघटनेने तीव्र विरुद्ध दर्शवला आहे. असे असतानाही प्रशासनाने नुकताच महसूल विभाग स्तरावर बदल्या केल्या आहेत.
त्यामुळे कर्मचारी संपल झाले आहेत विभागाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता यावी यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने गठीत केलेल्या कळस्कर समितीचा अहवाल दोन वर्षांपूर्वीच प्रशासनात सादर केला आहे.
त्या अहवालाची अंमलबजावणी अध्याप न झाल्याने राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये एकच प्रकारचे काम वेगळ्या तऱ्हेने केल्या जाते त्याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांना होत आहे.
सचिव आयुक्त स्तरावर संघटनेने सतत संपर्क करून प्रलंबित मागण्याबाबत वेळ चर्चा ची वेळ मागितली याबाबत प्रश्न डोळे झाक केल्यामुळे जिव्हाळ्याच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.