SET Exam | मोतीराम पौळ यांचे सेट परीक्षेत यश

पुणेमोतीराम पौळ हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झाले असून ते या पदासाठी पात्र ठरले आहेत. २७ डिसेंबर २०२० रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर जाहीर केला आहे.

परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, फरकंडा येथे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पौळ यांनी माधवराव पाटील महाविद्यालय, पालम येथे पदवी, फर्ग्युसन कॉलेज, पुणे व अण्णासाहेब मगर कॉलेज, हडपसर येथे पदव्युत्तर पदवी आणि पुणे विद्यापीठ येथे पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. ते सध्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रांवर पीएचडी करीत आहेत.

पौळ हे भारतीय जैन संघटना आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या संस्थेत संहिता लेखक म्हणून कार्यरत आहेत. तसेच २०१४ पासून अक्षरदान दिवाळी अंकाचे संपादक करतात आणि अक्षरदान प्रकाशन संस्था चालवतात.

गेल्या सहा वर्षांपासून ते सेट-नेटची तयारी करतात. मागील दोन वेळा फक्त एका गुणाने त्यांची सेट गेली होती. यावेळी त्यांनी सर्व व्याप सांभाळून जिद्दीने अभ्यास केला आणि यश मिळविले. याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.