सनी देओलने केले “गदर 2’चे मोशन पोस्टर रिलीज

मुंबई – सनी देओल आणि अमिषा पटेलच्या हिट “गदर’चा सिक्‍वेल असलेल्या “गदर 2’ची औपचारिक घोषणा झाली आहे. सनी देओलने “गदर 2’चे मोशन पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून रिलीज केले आहे. 

“गदर 2′ 2022 मध्ये रिलीज होणार आहे. या सिक्वेलचे म्युझिक खूपच इंटेन्स असणार आहे. या मोशन पोस्टरमध्ये “गदर 2’मधील कलाकार आणि टीमची ओळख करून दिली आहे. “गदर’ची कथा जेथे संपते तेथून सिक्‍वेलची कथा सुरू होत नाही. कारण तारासिंग आणि सकीना यांचा मुलगा आता मोठा झालेला आहे. या नव्या कथेत पहिलीच पात्रे पुढेही आपले रोल करताना दिसतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

“गदर 2’चे कथानक देखील पहिल्या भागाप्रमाणेच भारत-पाकिस्तान दरम्यानच्या संबंधांवर आधारलेले असणार आहे. “गदर-एक प्रेम कथा’चे डायरेक्‍शन ज्यांनी केले होते. त्या अनिल शर्मांकडेच सिक्‍वेलच्याही डायरेक्‍शनची जबाबदारी असणार आहे.

अनिल शर्मांच्या अगदी अलीकडच्या सिनेमांनी काही विशेष प्रभाव दाखवला नाही. सध्या अनिल शर्मा आपल्या “2′ वर विशेष कष्ट घेत आहेत. या सिनेमात संपूर्ण देओल फॅमिली एकत्र दिसणार आहे. त्याच्याकडूनही शर्मांना विशेष अपेक्षा आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.