मुंबई – तान्हाजी चित्रपटाच्या तुफान यशानंतर दिग्दर्शक ओम राऊत आता आणखी एका धमाक्यासाठी सज्ज झाले आहेत. बाहुबली स्टार प्रभास आणि ओम राऊत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ओम राऊत यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
दुर्गुणांवरील सद्गुणांच्या विजयाभोवती फिरणाऱ्या हिंदुस्थानी या महाकाव्याचे चित्रपट रूपांतर असून यात व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. यानिमित्ताने बाहुबलीनंतर प्रभास पुन्हा एपिक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.
Celebrating the victory of good over evil! – #Prabhas #Adipurush@omraut @ItsBhushanKumar @vfxwaala @rajeshnair06 @TSeries @RETROPHILES1 pic.twitter.com/QUGUW21DTt
— Prabhas (@PrabhasRaju) August 18, 2020
नुकतंच, ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये Celebrating Victory of Good over Evil असं लिहिण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये भगवान श्रीरामांचे धनुष्यबाण दिसत आहे. तर दुसरीकडे हनुमान आणि रावणही दिसत आहे.
दरम्यान, ‘आदिपुरुष’ हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शन टप्प्यात असून पुढच्या वर्षी चित्रीकरणास सुरुवात होऊन 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा थ्रीडी चित्रपट हिंदीसह तमीळ, तेलगु, मल्याळम, कन्नड आदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.