आई राजा उदोऽऽ उदोऽऽ; तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी असणार विशेष नियमावली

पुणे – महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत व साडेतीन शक्ती पीठा पैकी एक पुर्ण पीठ असलेल्या श्री कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवास उद्यापासून आरंभ होणार आहे.

याचेच औचित्यसाधत तुळजापूर मंदिर प्रशासनासह नगर परिषद व पोलीस विभागाची तयारी जोरात सुरु आहे. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच गुरुवारपासून (दि.7) संपूर्ण राज्यातील धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे खुली करण्यात येणार आहेत.

जर तुम्हाला तुळजापूर येथील भवानी मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस होणे आवश्यक असणार आहे. मंदिरात प्रवेश करतांना सर्व

भक्तांकडे करोना लसीचे दोन डोस घेतलेले कार्ड असणे आवश्यक असेल. तसेच, मंदिरात 10 वर्षाच्या आतली मुलांना आणि 65 वर्षाच्या पुढील नागरिकांना प्रवेश नसणार आहे. अशी माहिती मंदिराचे विश्वसनीय यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.