नाशिक – राज्यात दररोज महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. एकीकडे राज्य सरकार महिला अत्याचार थांबविण्यासाठी शक्ती कायदा आणू पाहत आहे. तर दुसरीकडे महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. असे असताना नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलीला ठार मारण्याची धमकी देत एका महिलेवर अनेकवेळा बलात्कार केल्याचा प्रकार समोर आली आहे.
आजाद शेख असे आरोपीचे नाव असून सातपूर पोलिसांनी त्यास अटक केली आहे व गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपीने 17 डिसेंबरला पुर्ण रात्र एका लॉजवर नेवून बलात्कार केला. यावेळी महिलेने तेथून पळून जाण्याचा पर्यंत केला तेव्हा आरोपीने तिच्या छोट्या मुलीच्या गळ्याला चाकू लावत ठार मारण्याची धमकी दिली. आरोपीने अशाचप्रकारची धमकी देत महिलेला ब्लॉकमेल करत अनेक वेळा बलात्कार केले. याशिवाय एका मित्राच्या घरी सुद्धा आरोपीने बलात्कार केला व पिडितेस सोडून दिली. या घटनेनंतर आरोपीने नाशिक शहरातून पळ काढण्याच पर्यंत केला मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्य़ा आवळल्या. पुढिल तपास पोलिस करत आहेत.